मला हि आज मन मोकळ बोलायचय
मला हि आज मन मोकळ बोलायचय
दबल्या भावनांना मुक्त करायचय का नसतात उत्तर सगळ्याच प्रश्न्नांची आपल्याकडे ह्या प्रश्न्नांचा उगमच मला आता शोधायचाय शब्दांना का वाटा असतात आणि अर्थ वेगळे भावनांनी मग घायाळ होऊन कुणा जवळ जावे विचार एक अन कृती दुसरी हि विसंगती कशी भागत जाणार्या ह्या गणिताची शिल्लक मी राखावी कशी गाजतो फक्त अधिकार मनावर रक्तबंबाळ मग माझ्या भावनांनी द्यावी साथ किती बाधंता बाधंता सुटत जातात रेशमी गुंतलेली नाती मग ह्या रेशमी नात्यांना महत्त्व किती का नसतात उत्तर सगळ्याच प्रश्न्नांची आपल्याकडे ह्या प्रश्न्नांचा उगमच मला आता शोधायचाय ********************************************************
या मातीतुन जन्मलो
या मातीतुन जन्मलो या मातीतच मी संपणार येतानाही जवळ नव्हते काही जातानाही काहीच बरोबर नाही मी नेणार परमेश्वरांन दिलेल आयुष्य प्रत्येक क्षण क्षण मी जगणार दु:खाला सुखाचा सोबती करुन संकटाशी हितगुज मी करणार जितके जमेल तितके हासु वाटत सर्वांचे अश्रु विकत मी घेणार तु दिलेले जीवन तुझ्याच कार्यास बहाल मी करणार या मातीतुन जन्मलो या मातीतच मी संपणार दु:खी कष्टी न राहो कोणी यासाठी सद्येव मी झिजणार अन्यायाशी लढा देत प्रामाणिकपणा मी जपणार सतत कष्टत राहुन माझ्या घामाचे चित करणार या मातीतुन जन्मलो या मातीतच मी संपणार शेवटी मरण येईल तेव्हा मुखी तुझेच नाम घेणार जाता जाता हे जीवन ईतरांच्यासाठी सार्थकी मी लावणार या मातीतुन जन्मलो या मातीतच मी संपणार ********************************************************
मी रातराणी
मी रातराणी होऊनी
तुझ्या अंगणी दरवळले वेचुन वेचुन सुदंर स्वप्ने तुझ्या रात्रीनां सजवले भारावुन तझ्या मोरपिशि शब्दांना तुझ्या अंगणी थुई थुई नाचले मी रातराणी होऊनी तुझ्या अंगणी दरवळले सुख माझे असे क्षणभर रात्र येऊन बघ समिप माझ्या माझा गंध तुझ्यातुन दरवळेल मी रातराणी होऊनी तुझ्या अंगणी दरवळले ********************************************************
राग
किती वाईट असतो ? आपल्या फुललेल्या आयुष्यला पार गिळून खातो आल्येल्या सुखाना पायदळी तुडवत स्वप्नांची राखरांगोळी करतो हा काळ खूप वाईट जीत आपल्यातही परकेपणाचा भाव दिसतो सुंदर वेचलेले क्षण, जपलेल्या आठवणी याना पायी तुडवत आपला विजय करतो थेंब थेंब करून साठाव्लेले हसू एकटेपणा व्यापू पाहतो आपल्या अंतर मनावर ताबा मिळून सामंजस्पणा गमाउन बसतो गुंतलेले जीवाचे नाते बोचर्या शब्धणि घायाळ होतात डोळ्यात पाणी देऊन मनात खोलवर जखमा रुततात वेळीच मिळवावा ताबा रागावर मणजे स्वाभिमान पेटून उठतो आणि अहंकार जळून जातो ********************************************************
हे प्रभू
हे प्रभू,
तुझे रूप चित्ती असावे मुखी सध्येव तुझे नाम रहावे जळी स्तळी तुझे रूप दिसावे बरसता पाउसही तुझा प्रेमाचा पुरावा भर उन्हात सोडून मला माझ्या परीक्षेचा काळ असावा चुकी जर झाली ह्या हातून तरी प्रायचीत ही माझ्याच हातून व्हावे माझ्या चुकीने सदेव तुझ्या चरनी नतमस्तक व्हावे कवटाळुन घेई रुद्यायासी मला जसे आईशी लेकरू बिलगे तूच आई होऊनि ह्या लेकरास जपावे आली जर संकटे समोर तरी मी न डगमगावे ह्सत ह्सत ह्या भवसागरातुन तूच मला तरावे कामना वासना ह्या सतत छःळती ह्या लोभातून तू मला सोडवावे द्खवावा मार्ग सत्संगाचा आणि मुक्ती मोक्ष्य तुम्हीच द्यावा फक्त एकच आहे आस ह्या मनाची शेवटी तुमच्या चरणीच मी देह सोडावा ********************************************************
मैत्री
मैत्री म्हणजे काय? जी मला न बोलतही समजून घेईल एक असे नाते जे दुव्यासिवाय गुंफत जाईल जीत शब्द्ंची गरज नाही तुझा नजरेनेच काम होईल जीत हाक न मारता तुझी साद येईल माझा मित्रा तुझा मैत्रीतुन ही कमाल होईल रूस्लो भांडलो किती तरीही मैत्री नएहमी मागे वळून पाहील तू मी न करता पहिली माझा कडून तुला साद येईल कोण चुक कोण बरोबर हे मैत्रीस नक्ले मान झुकवत सदा तुझा हुकुम मानणे तुझी हार ती माझा मैत्रीचि हार असावी माझा विजयात ही तुझा मैत्रीचि जीत असावी सर्वात श्रेस्ट मैत्री असावी ह्रद्याचा कोपर्यात हीच एक प्रामाणिक टेव असावी ********************************************************
ते सुखी कुटुंण्ब
माझ्या खिडकीतून दिसते ते सुखी कुटुंण्ब
वयाचा उतारतही दोघंनि कस बांधून ठेवलेले चिमणी चिमणी पाखर मोठी होऊन गेलेली उडून आपल्या स्वॅप्नाना फूलवत रोज दोघंना बघून मग मला ही हेवा वाटे आजोबांची धावपळ आजीच समजावन मग राग रुसवा आजोबांच आजीला मनवन दोघांच एक्मेकाना सांभाळत एक एक क्षण वेचीत होती ऊन पाउस सर्व ह्या कौलानि पचवल होत मन्हूंच नात्याच घर्ट अजूनही खंबीर होत कुणाकडूंच कसलीच अपेक्षा नवती आपली क्र्त्व्य त्यानी वेळोवेळी बजावली होते आजींचा आजोबांच्या हातात हात एकमेकांच्या आधाराची जाणीव होती पण एकद अचानक, ती वेळ खूप घातकी भरल्या डोळ्यानि मी पाहिली पाहिला तो शेवटचा रक्ताचा थेंब आणि सुटता स्वास आजींचा आजोबांचा कुशीत आणि आजोबा हतबल विरहाचे कृषण त्याना जाळत होते एकटेपणाचे भय जाचत होते आजींचा स्वासानि हात टेकले आणि त्यात क्षनि आजोबांनिही आपले प्राण त्यागले होते खरच होते हे सुखी कुटुंब माझा खिडकीतले जेते एकमेकांना होती एकमेकांची सात शेवटपर्यंत ********************************************************
तू अर्धवट सोडून गेलेली
तू अर्धवट सोडून गेलेली
रात्र अजुन तशीच आहे माझ्या बहरळयेल्या स्वप्नांची बाग ही तिथेच आहे दाराची कडी ही अजुन लावली नाही की डोळ्यांची पापणिही लवत नाही आस्वाणी डोळ्यांची तहान भागत नाही स्वप्नानी ही कशी बाजी मारली आहे मी फूललेल्या रात राणीचा सूगनध ओंजळीत घेऊन दारापाशी आहे तुझा पर्तीची वाट ही तिथेच रेंगाळली माझा हात धरून रात्र बग न तिथेच विसवली ********************************************************
तोच रोजचा रहिवासी फुटपाथ
तोच रोजचा रहिवासी फुटपाथ
त्या तिथच बसतो तो बिकारी रोज मला येता जाता दिसतो पण काळ सध्याकाळी हसला माझा कडे बघून रोजचे मरण तुजे पाहावत नाही माजे बग भविष्याची कसलीच चिंता या मनाला नाही देह माझा भोगचा अधीन नाही तुझा सारखी कसलीच लालासा मजला नाही कुणाकडे कसलीच मागणी नाही जे मिळाले त्यात समाधानी राही जो देई त्या चेही भले जो ना देई त्याचे ही भले तुझा सारखे सिव्या शाप या मुखी नाही पण मनी हे पटत नाही ही धावपळ निरथक नाही सांड्पान्या सारखे कुजत राहणे हा माझा स्वभाव नाही काळानुसार बदल हा तर निसर्गाचाच नियम प्रभूचा ही आपणा सर्वंश हाच संदेश पण एक कुठून चालायचे कूट परयन्त चालायचे हे ज्याचे त्यानीच ठरवायचे ********************************************************
बाळाची चाहूल
तुझा येण्याची चाहूल लागताच माजे मी पण विसरले तू माझा तून साकारणार हा भावनेने मन गाहीवरले तुझाशी एक अटूत नाते जडणार मी अंतरी सुखावले तुझा इवल्या इवल्या पावलानि जग मी आता जिंकणार तुझा येणे मला पूर्णता देणार तुझा लहांन्श्या हालचलीने ही अस्वस्थ मी होणार तुझा स्वागतासाठी डोळ्यांचा पैघाड्या घालणार तुझा आई हाके साठी कां नही आता आतूरले ज्या शनांची वाट पाहत कालही थांबला आहे त्या वेळे साठी माजे स्वास ही मी रोखले आहे तू ए लवकर माझी कूस व्याकुल आहे माझा ओंजळीत आज जणू आभाळ सामावले आहे ********************************************************
समाधिसाठी
सगळीकडेच झालेत उंच उंच मनोरे
झेप घेतात आकाशाच्या दिशेने तूटत जमिनिशी नात अन आधारही सुटतो ह्या उंच उंच मनोर्यास माणूस सुखी घर म्हणतो बदलली व्याख्या सुखी जीवनाची माणुसकी लुप्त होऊन जागा घेते गर्वची आणि सुखावतो अहंपणा ह्यालाच माणूस सुखी घर म्हणतो आपलीच नकोशि वाटतात नाती फक्त पैशाचा बाजार भरतो सगळ समीटून उराशी काही मोकळ्या स्वासांसाठी तरसतो ह्यालाच माणूस सुखी घर म्हणतो शेवटी ह्या उंच उंच मनोर्यात मिळत नाही जागा ह्या वीतभर शरीरसाठी शेवटास सर्व हाती असूनही समाधिसाठी काहीच उरत नाही ********************************************************
शपथ तुला सांगतो, मी तुझाच आहे. !!!
शपथ तुला सांगतो, मी तुझाच आहे. देहान जरी असेन परदेसी, तरी मनान तुझ्या जवळ आहे. सभोवती जरी घोळका, त्यात तुझी सध्येव कमी आहे. दुराव्याचे दु:ख नाहि मला, तुझा एकटेपणा छळेल. शपथ तुला सांगतो, मी तुझाच आहे. देहान जरी असेन परदेसी, तरी मनान तुझ्या जवळ आहे. दिवस तुझा कसता जाईल कसाही, पण सांज सतावेल. तुळशीव्रुन्दांवना जवळ दिवा ह्ळुच मालवेल. मंद वारा वाहता, आठवांची सर येइल, डोळा तुझा पाणवेल. आवाज नको हुन्दंक्याचा, अश्रुही न ओघळु दे. घे कवटांळुन लेकरास उराशी, बघ मी ही तिथेच असेन. शपथ तुला सांगतो, मी तुझाच आहे. देहान जरी असेन परदेसी, तरी मनान तुझ्या जवळ आहे. .सांज ढळता रात्रिचा प्रहर, चांदण्यांची सजेल मैफिल. काहुर मनी उठेल, विरह सतावेल. कुशी नको पलटु, मग येईल पुन्हा आठव, रात्र डचता, विरह सतावेल. आवर स्व:ताला, साभांळ लेकराला अन आपल्या घराला. आठव ते वचन, मी जाताना तु दिलेले. होऊन मी कर्ता पुरुष, तुझे कार्य हाथी घेईन. एकच असु दे ध्यानीमनी, सध्येव मी आहे तुझा समीप. शपथ तुला सांगतो, मी तुझाच आहे. ******************************************************** | हे प्रेम असेच
ना तुला कधी कळायचे
ना मलाही ते सांगायचे हे प्रेम असेच रुजायचे भेटीतुन वाढायचे सहवासाने जपायचे शब्धांवीना बोलायचे स्पर्शाविना जाणायचे ना तुला कधी कळायचे ना मलाही ते सांगायचे हे प्रेम असेच रुजायचे ********************************************************
विसंगत
काल मन नदीसारख
विसंगत वागल सागराच्या शोधात नकोत्या प्रवाहात मिळुन वाह्त गेल होती फक्त सागराची ओढ नव्ह्त माहीत आपल परक बेभान सुटल पळ्त वार्यासंगे भेटीस सागराच्या अचानक वाह्ता प्रवाह थांबला एकाच जागी सांड्पाण्याचे डबके होऊनी तेव्हा नदीस कळले जीवन आता संपले. ********************************************************
आलेल्या सुखानो
आलेल्या सुखानो
जरा थांबा तीत दुखाचा पाहुनचार होत आहे तुम्हीही घटकाभर विसावा दुखचे सन्त्वन करत आहे मग सुख ही हसले म्हणाले, क्या माणूस आहे जगने ह्याने जाणले म्हणूंच हा सदेव सुखी आहे ********************************************************
वेध
काय म्हणालिस
जरा परत बोल पडू दे शब्दांचा पाऊस आणि मलाही मन्शोक्त भिजू दे तर्सल्यल्या देहा जरा मला ही ओलावा घेऊ दे फुलू देत आठवणी आणि भूतकाळ होऊ दे जागा मग मला ही तुज्या मिटित हलूवार येऊ दे डोळ्यानी चुंबू दे शब्दाना आणि मलाही तुझा मनात गुन्तु दे तुज्या अंतर मनाचा मलाही आता वेध घेऊ दे ********************************************************
उसळू दे
बरसु दे, पावसास आज तुफान
उसळू दे सागरास हि बेभान शब्धाना हि आज वाचा फुटु दे आनि भावनानाहि बोलता येउ दे नाही कळत तुलाही सांगता काही म्हणूनच निसर्ग तुला निरोप देऊ दे बहरलेला वसंत आज तुला ही जरा छळु दे कळु दे तुलाही मनाची घालमेल आणि अस्वस्थ तुलाही वाटू दे कवटाळुन पावसाला कुशीत मग तू ही सागरसंगे बेभान ए शब्दांची होऊ देत फुले तुही आंगणभर पसर होऊन सुगंध जीवनात माझ्या अखंड दरवळ ********************************************************
मन कुठेच रमत नाही
बरेच दिवस तुजे इकडे एने झाले नाही
पाउलवाठ थांबली तेथे रातराणी ही हासत नाही तुझा शिवाय आणि तारा ही मंदवल्या आभाळ भरूणही बरसतनाही आणि डोळयनची तहान भागत नाही तू येऊन तरी बघ तुझा शिवाय एथे माझे कुणीच नाही सोबती सारे असूनही मन कुठेच रमत नाही थांब माझेच आता मला ठरवू दे कूठ पर्यंत चालायचे तुझा सोबत मणजे माज्या हरवन्यचे भय मलाच राहणार नाही ********************************************************
माझा मागोवा नको
परत कोणत्या जीवास
तुझा लळा लाउ नकोस तू परतून एसिल ही आस जीवास लाउ नकोस एकाकी मनाला शांत रहुदे तुझा आठवणिनी सांग परत भूतकाळातल्या खुणा छेडू नकोस नको ऋनानुबंध मन एकाकी रहुदे सांग तुझा शब्दाना मला तुझात नको गुन्तुदे एकटाच असुदे प्रवास तुझी आता सोबत नको सांग तुझा पौल खुणा ना माझा मागोवा नको ********************************************************
अशेच बसले होते समुद्रकिनारी
अशेच बसले होते समुद्रकिनारी
तुजे नाव वालुवर लिहत पण वारा बग न संत वाहत नाही समुद्र शांत आहे पण किनारा लाटेस व्याकुल सूर्यास्ताला का दोघांची गाट्ट्भेट्ट नाही दिवसभर असतात खेळत लाटेचे किनार्यला आलिंगन पण सान्ज होताच कस हे विरहाच कृशण आठवाची होते दट्टिगाट्टि मग डोळ्यात अंग शहाराही पाट सोडत नाही वाट पाहता पाहता सान्ज होत माजे पौल मग तितेच अड्डते मन खट्टाल मानत नाही देह असूनही त्यात प्राण नाही सान्ज सरताच चांदण्याही बग न कशा चीडूउन जातात चंद्र जवळ असूनही मला कशा दूर दूर नेतात कलत नाही वेळेला क्या हवे पण मनाला एकच ट्टाउक सकाळची वाट पाहणे ********************************************************
अगदी तस
तुझे चित्र रेखाटले
त्यापेक्षा ही तू खूप सुद्र्र आहेस विचाराने कोरया वहिच पान पलटाव अन् तुझ प्र्य्तेक पानावर वेगवेगळ प्रतिबिंब दिसाव अगदी तस तुज्या एखाद्या चुकीलाही तुज्या कितीतरी सुखद आठवणिनी माफ कराव अगदी तसच जवळ कितीही सोबती असल्या तरी तुझी कमी जाणवावी अगदी तस तू नसताना तुज्यासी बोलाव, हसाव रडाव अगदी मन मोकळ भांडाव आणि मीच मागे वळून पहाव अगदी तसच सतत पाझरत राहावा झरा तुझा आठवणीचा र्हुद्यात साठःवावा हा मैत्रीचा मेवा आयुषभर पूर्ववी ही शिदोरी अगदी तस ********************************************************
उधळल्या सागारात
उधळल्या सागारात झोकून दिले स्वतश्
बेभान वार्या संगे वाहत जात बोचरया शब्दांची फुले पायदळी तुडवत असंक्य लाटा अंगावर झेलत दिले स्वतस झोकून चालत राहेले बेभान क्षतिज्याच्या दिसेने हात पसारून नेहमी नव्हती कधीच कसली अपेक्षा पण अपेक्षानीच मला ओढले जीवघेणा ऋनानुबनधाणी पायी जोखड कसे घातले उतरवून सारे मुखवटे केले स्वतश् मुक्त जुना आठवणिना दिली मूठमाती आणि धरला सरळ मार्ग मागे वळून न पाहता पायीचा रस्ता तुडवत क्षतिज्य समातर होते माज्या कडे हात पसरून ********************************************************
प्रिय आईस (सासूबाईस)
आई तुम्ही गेल्यापासून आपले तुलसी वृंदावन पाणी घालूनही हसत नाही गुलाबाच्या झाडाला आता कळी धरत नाही तुमचा आठवणिनी आपले घर भरले आहे प्रतेक ठिकाणी तुमचे वास्तव थिर आहे तुमचा पुरणपोलीची चव माझा हाती नाही दिवाल सण ही आता साजरा होत नाही तुमची सवय आता जाता जात नाही भूतकाळाचा सुखद आठवणी सोडता सोडवत नाही सासू कधी आई होऊ शकत नाही पण तुमचा सासुपनातही तुमचा मोटेपणीची जाणीव होई तुमचा मोटेपणाला माझी ही छोटीसी मानवंदना ********************************************************
मरणही हल्ली कठीण झालय
मरणही हल्ली कठीण झालय
बघून मला तेही फितूर झालय
आरशातही आता पाहावत नाही
त्यात माझे प्रतिबिंब ही हल्ली दिसत नाही
सावलिनेही बघ ना
कशी पाठ फिरवली
ती ही आता माझा संगे
बोलत नाही
वेळही आता सरता सरत नाही
माझा कडे तीही काही मागत नाही
निसर्गाही बग ना कशी
बेईंमान झालl
भर उन्हात सोडून मला
सावळीला ही परका झालाय
तेव्हा पाडून रिमजिम पाऊस
बघ मला कसा भीजउन गेलाय
आता कोरड्या ह्या जीवनात माझा
तुझा आठवणीचा ओलावा ठेऊन गेलाय ********************************************************
उन्मत्त व्यभिचार माजला कसा हा !!!
उन्मत्त व्यभिचार माजला कसा हा,
काहुर मनी उठते असे.
होती कुस तुझी शांत माऊली,
सोडुन मजला तु गेलीस कुठे.
शिव्या शाप अन हाणामारी,
प्रेमाचा लवलेश नसे.
उन्मत्त व्यभिचार माजला कसा हा,
काहुर मनी उठते असे.
स्वप्नांचे तर दुरच सोडा,
ईथे शांत झोप नसे.
जीवन कसे जगावे सांगा,
सा़क्षात काळ समोर दिसे.
स्पर्धा स्पर्धा नुसती स्पर्धा,
सगळीकडे खुर्चीचा खेळ रचे.
उन्मत्त व्यभिचार माजला कसा हा,
काहुर मनी उठते असे.
कसा करावा शेवट याचा,
हे तर कलियुग असे.
नव्यानेच तुम्ही अवतार घ्यावा,
हाच ह्या राक्षसाचा संहार असे.
उन्मत्त व्यभिचार माजला कसा हा,
काहुर मनी उठते असे. ********************************************************
मी पेटवुन दिली मशाल तुझ्या हाथी !!!
मी पेटवुन दिली मशाल तुझ्या हाथी,
हा वणवा आता पेटतच राहिल.
नको पाहु मागे आता,
तु पुढे चालतच रहा.
अन्याय, अत्याचार, गरिबी,
यास वणव्यात पेटवत जा.
मी पेटवुन दिली मशाल तुझ्या हाथी,
हा वणवा आता पेटतच राहिल.
मुक्यानांही वाचा फुटु दे,
आणि व्यभिचारालाही समज.
कष्टांचे चित होऊ दे,
अन पापाचे निवारण.
मी पेटवुन दिली मशाल तुझ्या हाथी,
हा वणवा आता पेटतच राहिल.
नको पाहु मागे आता,
तु पुढे चालतच रहा ********************************************************
शेकडो लढाया जिंकल्या आम्ही
शेकडो लढाया जिंकल्या आम्ही,
प्रेमाची एक लढाई हरलो मी.
नव्ह्ते पाहीले डोळ्यात प्रेम होते,
माझ्या डोक्यात मैत्रिचे खुळ.
होते समीप प्रेम वारे,
अन मी अजाण वेडा पीर.
शेकडो लढाया जिंकल्या आम्ही,
प्रेमाची एक लढाई हरलो मी.
भोवती घोंघावे भुंगा मी,
ती सुंन्दर सुगंधी फुल.
प्रेमरस पाझरतो,
ही प्रितीचिच खुण.
होते समीप प्रेमवारे,
अन मी अजाण वेडा पीर.
शेकडो लढाया जिंकल्या आम्ही,
प्रेमाची एक लढाई हरलो मी.
कळीचे फुल झाले बहरला वसंत,
मी माझ्याच मस्तीत होतो धुंद.
वेळ निघुन गेली,
कळी मावळली, सरला वसंत.
शेकडो लढाया जिंकल्या आम्ही,
प्रेमाची एक लढाई हरलो मी
********************************************************
शिरला घुसखोर शिरला घुसखोर,
डोळ्या देखत तुझ्या.
रक्ताची रांगोळी खेळत,
मायभूला लुटण्या.
सळसळते रक्त नसांत,
अंगात वीज.
पेटून उठलो,
करणार राख.
उडवणार बार,
होईन मीही खाक.
तेव्हाच येईल ,
झोपलेल्यानां जाग.
शिरला घुसखोर,
डोळ्या देखत तुझ्या.
रक्ताची रांगोळी खेळत,
मायभूला लुटण्या.
डोळ्यांन देखत होतो,
उध्वंश.
अन तुम्ही धर्म-जातीचा,
वादात वग्न्य.
रक्त झोपले,
अन जीवन तुमचे व्यर्थ.
आठवा जरा,
जुलमी इग्रजांचा काळ.
शिरला घुसखोर,
डोळ्या देखत तुझ्या.
रक्ताची रांगोळी खेळत,
मायभूला लुटण्या.
आठवा शिवाजी राजे,
अन टिळक, बोस.
रक्तास येऊ दे तुंमच्याही,
क्रांतीचा रंग.
नुसती नको श्रधांजली,
अन टिपूसभर आसव.
पेटून उठा तुम्ही ही,
येऊ दे त्यांच्या त्यागास अर्थ.
शिरला घुसखोर,
डोळ्या देखत तुझ्या.
रक्ताची रांगोळी खेळत,
मायभूला लुटण्या. |