स्मिता शिंदे

शून्य

आयुष्य शोधतांना शून्य दिसला होता
ह्रदयात माझ्या आज शून्य उतरला होता.

जून्या जखमा ओल्या झाल्यावर
पुन्हां अश्रुनी शून्य भरला होता.

दिवस सपंवुन अश्या कातरवेळी
काळोख शोधतांना शून्य उरला होता.

जीवनाचा पाहून अखेर आता
सरनासोबत शून्य सरला होता.

आयुष्य शोधतांना शून्य दिसला होता .........
 
 
मन वेड......

मन अजुनी जळत आहे आतल्या आत
मन अजुनी तळमळत आहे आतल्या आत
मनाला ना अजुनी गवसली स्वत:ची वाट
मन दिशाहीन घुटमळत आहे आतल्या आत
मन अजुनी फ़ुल होउनी उमलत नाही
कळी अकाळी गळत आहे आतल्या आत
शब्द देखणे उभे आहे बोट धरुनी वाट
मन वेड पळत आहे सोडूनी स्वत:च हात......

माझ्या चारोळ्या

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

 

गेलं तर

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत

चालायला गेलं तर
निखाऱ्यांही फूले होतात

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत