घरामधे वावरताना मीपणा टाकायचा असतो
मी मी करून कुणी मोठा होत नसतो
आपल्यापूर्ती पाहून आपलीच माणसे दूर जातात
काळीज असणार्या माणसालाच फक्त वेदना होतात
माझ माझ म्हटल की घर काही माझा होत नस्त
दुसर्याला नीन्द्ल्यन आपल्याला कुणी वंदत नस्त
घरासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचायचा नसतो
कारण तो ऐकण्यासाठी जवळ कुणीच उभा नसतो
करून सावरून सर्व काही विसरायचे असते
नाही तर मग जीवनाचीच गोळा-बेरीज चुकते
घरात वावरताना दुसर्याच्या सुखात सुख पाहायचे असते
आणि दुसर्यांचा दुखात आपले दुख विसरायचे असते
घरा मधे वेगळे घर करून राहायचे नसते
कारण माझ माझ म्हटल की घर काही माझा होत नस्त
दुसर्याला निन्द्ल्यन आपल्याला कुणी वंदत नस्त