********************************************************
अरे पावसा असा पडू नको दिवसा
२०-२० क्रिकेट सामन्यात पाउस पडताना आपले कृषि मंत्री तेथे पावसाला म्हणतात
शेती मंत्री :-
पावसा पावसा असा पडू नको दिवसा ...२
म्हणे माझ्या पोरांना २०-२० क्रिकेट थोड खेळु दे .
आणि माझ्या बीसीसीआई चा गल्ला थोडा अजुन भारू दे ..
तेंव्हा अरे पावसा असा पडू नको दिवसा .
पाउस :- कृषि मंत्र्याला
अरे अरे मंत्र्या माझ्या तोंड सुकलेल्या संत्र्या.....
मी जर पडलोच नाही तर
बळीराजा इथला रडेल रे .
मग तुझाच पाटबंधारे मंत्री शिव्या मला घालून
इथे कृत्रिम पावसा साठी प्रयोग करेल रे
अन मीच लोकांसाठी वाईट ठरेल रे..
तेंव्हा माझ मला पडू दे
तुझी क्रिकेट मैच राहिली तरी रहू दे
तो सचिन सेंचुरी नेहमीच करतो
बळी राजाचा बळी जायला नको
अन त्याचा कर्जाचा हप्ता चुकायला नको.
....
कृषि मंत्री :
अरे अरे पावसा असा पडू नको दिवसा ..
बळी राजाचा कर्जाचा हप्ता थकलाच नाही
दुष्काळ जर पडलाच नाही तर
बैंक कर्ज कोणाला देणार
आमचा सावकार कोणाच्या जिवावर जगणार
इथे कुणी आत्महत्या जर केलीच नाही
तर पेपर अन संसदेत आम्ही कशावर बोलणार ....
कुणाच्या कर्ज माफिवर आमच्या बैंकाची देनी आम्ही फेडनार
तेंव्हा तू आपला पडू नको
......
पावसा पावसा असा पडू नको दिवसा ...२
म्हणे माझ्या पोरांना २०-२० क्रिकेट थोड खेळु दे .
आणि माझ्या बीसीसीआई चा गल्ला थोडा अजुन भारू दे ..
तेंव्हा अरे पावसा असा पडू नको दिवसा .
********************************************************
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन.
गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली.
गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले .
तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले.
कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.
हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला.
अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला .
आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ?
मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा.
म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा "
निकशुन सांगा तुमच्या नेत्याना
तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची *** घाला!!!!!!
इथे तुमचे काय काम नाय
अन जोर जोरात रोज
'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"
********************************************************
कालच तू पाठवलेली स्क्रिप्ट मिळाली
कालच तू पाठवलेली स्क्रिप्ट मिळाली,
अन सगळ्या ओळी सगळे संवाद.....सगळे शब्द ...
पुन्हा पुन्हा वाचले ....अधाशासारखे
काय लिहलय ? ते कळले....
पण का ते नाही कळत.
त्या दोन ओळीतल अंतर
तू जरा नको इतक जास्त सोडलय.
म्हणुन च जरा त्रास होतोय
मीनिंग बिटवीन द लाइन मधला समजायला .
मला माझा रोल कळलाय ..
अखेर पर्यंत स्टेज वर वावरन्याची संधी की शिक्षा ?
पण स्व:ताची मात्र लवकर एग्जिट .
सगळे संवाद सगळे शब्द... तोंडपाठ
प्रकाश योजना नेपत्थ बाकी सगळे काम जोरात चालले .
मला काय त्याच ?
उद्या तू भेटल्यावर अर्था सोबत तालीम सुरु होइल की ?
पहिल्या अन शेवटच्या प्रयोगाला सुरवात होइल ?
हाच प्रश्न मनात घोळतोय
पुन्हा पुन्हा एकच विचार मनात रुळतोय
मला कल्पनाच नव्हती इतके भन्नाट नाटक करशील तू
माझ्या एक सुन्दर कल्पनेच
********************************************************
आठवानीची पान चाळतांना
आठवानीची पान चाळतांना
तुझेही एक पान हाती लागते .....
अन मग मन वेड्या गत वागते .
भवीष्य समोर सोबत वतर्माना
तरी भुत्काळात ओढला जातो .
सार काही आठवते मग जे कधी वीसरायाच ठरवल होतं....
मन मग त्या सगळ्या ठीकाणी फीरून येत जीथं कधी आपल भेटणं होत ....
आन सर कही आठवत ...
डोळ्यात सगळ आभाळ साठवत ....
जागा होतो तो कोनान कोना,
.................................
..............................
ठाउक आहे आज तुझं येण शक्य नाही
तरी तुझ्या भेटी साठी आतुर होतो ,
का कसा कुणास ठाउक कसा कातर वेळेला फीतुर होतो .
तू गेलीस ज्या वाटेवर मला सोडून ...
तीचा शी तीजा पर्यंत मी शोध घेतो ..
ठाउक असत तुझ परत येन नाही ..
तरी मन तुझीच वाट बघत ...
रोज सूर्य मवालेपरयंत ते भटकत असते .
रात्र झाल्यावर तुझ्या आठव्नीत जागत ...
********************************************************
इंग्रज अजुन कुठे गेले
इंग्रज अजुन कुठे गेले,
कांग्रेसवाले त्यांचेच चेले,
इंग्रज गेले आणि येथे इंग्रजी वाले आले ,
आपला पंतप्रधान इथला आजही बुशला घाबरतो,
पडलेला नेता सगळे होम मिनस्टर डिपार्टमेंट चालवतो .
परदेशी बाई साठी जो वेगळी चुल मांडतो,
सत्ते साठी तो आज आपल्याशी लोंकाशी भांडतो,
खुर्ची साथी त्याला आता तीच वावड नाही,
आन शेती मंत्री क्रिकेट मधे गुंततो ,
काल पर्यंत भांडनारे नेते आता एक मोर्चा बनवतात ,
गरीब कार्यकर्ते मात्र रोज एकमेकांशी भांडतात.
आपलेच लोक आपले रक्त सांडतात.
त्या गांधी नोटेलाही सलाम
अन गाँधी टोपीलाही सलाम,
ख्रुची साठी मंत्री जाती आजकाल बदलतात
तिथि पक्ष आन नोटंच काय उदया शाक्य झाल्यास बापही बदलतील आपला
"१०० मेसे ८० बेम्मान
फिरभी मेरा देश महान " या वाक्याला आजही ताल्ल्या मिलातात
गरीब भिचारे तुरुंगात आन मत्री हॉस्पिटल मधे सजा भोगातात
१५ ऑग अन २६ जाने लोक सुठी मानून मोजतात .
********************************************************
काल पाउस कसा धोधो बरसला होता
का धरतीच्या मिलनाला तोही तरसला होता.
आभाळ भरल होत मेघानी ,
मलाही छळले होत त्या आठवणीनीच्या दिवसानी ,
कस सांगू तिला आता पाउस मला आवडत नाही.
तिची आठवनीच्या तावडीतून मला तोही सोडवत नाही.
काल कोसळनारा पाउस शेवटी एकटाच आपला बरसून थकला .
क्षणभर सोबतही माझ्या घरात बसला ,
विचारणार तो मला ती आज घरात नाही वाटत,?
इतक्यात तिची पावसात मोडलेली छत्री माझ्या हॉल जपलेली दिसली .
तोही आपला गप बसला थोड्या वेळांन हळूच म्हटला
" तिच्या सोबत भिजायची मजाच होती वेगळी."
तशी ती लाखातुन वेगळी होती .
कशी अन कधी तिची माझी सोबत सुटली?
पावसाला सांगू कसा? ह्याच प्रश्नात मी अडकलो होतो .
आज एकटाच त्याच्या तावडीत सापडलो होतो.
कंटाळुन मी सौमित्राचा लावला मग गारवा ,
पाउस कधी गेला कळलाच नाही
पुन्हा माझ्या अंगणात रुळलाच नाही .
रात्र झाली की मी दिवा लावलाच नाही ,
पाउस बाहेरचा आता थम्बत नाही .
आम्ही दोघही गाळतो टिप टिप .....तिच्या आठवणीत
तो मेघाची अन मी पापन्यतली ,
तशी ती दूर नाही गेली आहे इथेच काळजात.
ती रुसून बसली आहे आम्हा दोघावर,
तिने आपल घरच बांधुन घेतलय ढगांच्या वर ,
जिथे पाउस पडत नाही आणि कोणी रडत नाही.
********************************************************
खुप कही मला बोलायाचे आहे
खुप कही मला बोलायाचे आहे ,
पण आता मी बोलणार नाही .
काळजतले दु:ख कुणाला आता सांगणार नाही.
लोक इतके शहाने आजचे की ,
उद्या त्यावर माझा हक्क ठेवणार नाही.
मी गाइल माझे गाणे आज ज्यांचा समोर
उद्या तीच लोक माझे सुरांशी नाते ठेवणार नाही .
मी आता कोणाशी बोलणार नाही .
गुपीत तीचे नी माझे कोणाला सांगणार नाही.
डोळ्यात तीच्या पानी आता खुठे दाटूनयेणार नाही ?
ती दूर कुठे गेली इथेच माझ्या हृदयात ठान मांडून आहे .
मी बोलतो रोज तीच्याशी एकांत रात्री ,
चांदण्या असतात संगतीला .
रोज नवी आठवण आमच्या दोघांच्या पंगतीला,
मी आता काही बोलणार नाही
गुपीत आमचे आता खोलणार नाही
ती येते रोज रात्री मला भेटायला नदीच्या कीनारी,
गुपीत तीचे पाण्याला मी सांगणार नाही .
ती असते फुलांच्या सवे बागेत मज संगे
पन्भोवार्यना समोर मी तीला आता भेटणार नाही.
तीने घेतलेली शपत ती मोडून गेली
पण मी माझे वचन मोडणार नाही .
मनातले माझ्या मी ,मी कुणाला आता सांगणार नाही.
तीने दीलाय होकार मी मलाही सांगणार नाही.
लोक इथले इतके शहाने की त्यावरही गुपचुप बोलायची संधी सोडणार नाही.
काल परयंत ती होती फक्त माझी मैत्रीण ,
आज झाली जीवाची सखी हे गुपीत मी पाळ्नार आहे .
आजुन खुप तीच्या संगे बोलायाचे आहे .
पण आता बोलणार नाही .
डोळ्यांची भाषया मी तीच्या कडून शीकनार आहे .
दोघांचा करार कालचा मी पाळ्नार आहे .
********************************************************