माझ्या कविता - (बाजी दराडे )
सोबत
उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत साथ तुझी सोडणार नाही हा पाऊस नसला तरी माझे बरसने थाबंनार नाही || १ || डोळे मिटून घे अन् घे हा मातीचा सुगंध त्यातही शेवटी येईल तुला फ़क्त माझाच मंद गंध || २ || तू असे म्हणतेस की तुझ्या आठवणीवर जगायचेय माझ्या आठवणी असताना मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ || तू नाही आता एकटी मीही तुझ्या साथीला आहे मृगजळ नाही तर माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ || म्हणुन खरे सांगतो तुला मला हवीय सोबत तुझी मी आहे फ़क्त तुझा तू राहशील का माझी ? || ५ || तू नव्हतीस तेव्हा जीवन माझे होते व्यर्थ तुझ्या साथीमधेच माझ्या जीवनाला आहे अर्थ || ६ ||
********************************************************
कोडे ....
सर्वात सुंदर काय ... ? मैत्रीतले मन .. का .. मनातली मैत्री ? मनात असते तुझीच मैत्री का .... तुझ्याच मैत्रीत मन ? कोडे........ मनातील तुझे विचार का ..... तुझ्या विचारांनी भरलेले मन ? कोडे ..... विचारां मधे फ़क्त तू का .... तू म्हणजे फ़क्त विचार ? कोडे ..... तू म्हणजे मन का ..... तू म्हणजे मैत्री ? कोडे..... तू म्हणजे प्रेम का प्रेम म्हणजे तुझी मैत्री ? कोडे.....
********************************************************
एक प्रश्न ...
एक प्रश्न ... मन म्हणजे पाउस .. का पाउस म्हणजे मन ? पण हे मात्र नक्की मी म्हणजे तू का तू म्हणजे मी ? हे माहित नाही ... पण हे मात्र नक्की पावसासोबत तू असली मी माझा नसतो भिजलेला मी.. का भिजलेले मन ? पण हे मात्र नक्की तू जवळ नसताना पाउस एकाकी वाटतो त्याची साथ द्यायला मग मी ही जातो तुझ्याच आठवणिनि आम्ही व्याकुळ होउन धावतो पावसाचे थेंब.. का डोळ्यातील आसवे ? पण हे मात्र नक्की मी आणि पाउस फक्त तुलाच शोधतोय आसवांच्या पुरात ... का आठवनींच्या थेम्बात ? पण हे मात्र नक्की एक प्रश्न ... मन म्हणजे पाउस .. का
पाउस म्हणजे मन ?
********************************************************
तिरंग्याला सलाम करताना
तिरंग्याला सलाम करताना आज पाउले नाही नाचली दर्दभ-या आठवणिनि डोळ्यात आसवे मात्र साचली ||१|| भिरभिरनारा वा-यावरचा तिरंगाही होता मंद आनंदाच्या क्षणालाही भितिचाच गंध || २|| नाना रुपे, नाना कला, बोल नवे, मुखडा जुना कितीही मार खाल्ला तरी शेपुट कुत्र्याचे वाकडे पुन्हा ||३|| असुराची जात त्यांची वर पुतनेचे दूध शांतीचे उपासक आपण रोजच हरतो द्युत ||४|| अग्नि परीक्षा घेवुनही अजुन नाही मुक्ति आधुनिक पुष्पक विमानांनी काही मिळेल का शक्ति ? ||५|| अणुची भीती नाही फ़क्त आपल्या तिरंग्याला त्याची झळ बसनाराच त्या हिरव्या रंगला ||६|| चला एक होऊ पुरे आता भेदाभेद सहजच होइल मग आसुरी शक्तीचा छेद || ७||
वन्दे मातरम् ....!!! जय हिंद ...!!!
********************************************************
निरोप
परवाच पाऊस येउन गेला, कुणीतरी आठवण काढते आहे ! असा निरोप देऊन गेला . त्याचा प्रत्येक थेंब माझ्या भेटीसाठी तरसलेला आणि माझ्या सर्वांगावर शब्द होउन बरसला. मी त्याला विचारले पावसाळा नसताना तू का आला ? तर तो माझ्यावरच ओरडला तुला माहित नाही का तो तुझा वेडा प्रिया. डोळ्यात पकडून ठेवतो मला मग माझा कोंडमारा होतो मी क्षणोंक्षणी झुरत राहतो चल आताच माझ्या बरोबर आणि मुक्त कर मला. मी म्हटले तू पण वेडाच आहे बघ माझ्या डोळ्यात त्यात तोच आहे पण मी नाही झुरत, माहित आहे मला तो माझाच आहे. मला काही झाले तर तो कसा राहिल ? माझ्या शिवाय माझे
दु:ख तो एकटा कसा वाहील ? आल्या पाउली परत फिर माझ्या प्रियाला निरोप दे सांग मी फ़क्त त्याचीच आहे फ़क्त शब्द नाही येत ओठावर पण वेडे मन त्याच्याच वाटेवर सांग त्याला डोली सजवून आणायला त्याच्या प्रियेला घ्यायला मी त्याचीच वाट बघतेय सांग माझ्या प्रियाला. तो पण आनंदाने आल्या पाउली परत गेला आणि पहाटेचा गारवा होउन निरोप घेउन आला. अंगावर रोमांच फुलवून बसला मिठीत घेउन आणि दवबिंदू उधळून हसला म्हणाला तू मला मुक्त केले. मी रोज येइन तुझ्या भेटीला आणि तुझ्या प्रियाचा स्पर्श आणेल माझ्या साथीला आता तो रोजच येतो साथीला प्रियाचा निरोप अन् स्पर्श देऊन जातो, तो रोजच पहाट गारवा होउन येणार आहे माझ्या प्रियाचा निरोप देणार आहे. माझा प्रिया येई पर्यंत मला दवबिंदूत भिजवनार आहे.
********************************************************
तू
तू अल्लड नदी की अवखळ वारा ? तू राजकुमारी की माझी स्वप्न सुंदरी ? माझ्या हृदयाची देवी की स्वच्छंदी सिहांची छावी ? तू अजाण बालिका की चंचल मनाची संचालिका ? तू शांत सागर की तू धगधगते नगर ? तू प्रेमाची मूर्ति की सौंदर्याची अभिजात कलाकृति ? तू माझी माऊली की माझ्या प्रेमाची सावली ? तू जगण्याची आशा की तू कातरवेळची निशा ? तू यशाचा थंड झरा की तू धगधगता निखारा ? तू मंदिरातील समई मंद की तू जीवनातील मुक्त छंद ? तू पहिल्या पावसाचे थेंब की माझे प्रतिबिंब ?
********************************************************
नेता
जिने मला जन्म दिला तिलाच मारल्या मी लाथा ! ओळखा बघू मी कोण ? आहो मी आहे तुमचाच नेता ! - १ - नसतात मला काही बंधू- भगिनी चे नाते मी तुमचा नेता अन् तुम्ही लाचार मतदाते - २ - सख्खा बाप-भाऊ सुद्धा मानतो मी वैरी तुमच्या आई- बहिणीची इज्जत लुट्न्याची मज्जाच लई न्यारी - ३ - अंतयात्रेत रडताना मला भाषणाची लई हौस , घरोघरी संडास योजनेतूनसुद्धा पाडतो मी पैशाचा पाउस - ४ - मी लाचार !, मी भ्रष्ट्राचारी ! पण माझीच कॉलर टाइट स्वत:साठी तुम्हीसुद्धा कमवता मग सांगा मीच का वाईट - ५ - माझ्याकडेच उद्योग धंदे खुप आणि काळया पैश्याचाही छंद, रक्त जाळताना तुमचे मिळतो मला आसुरी आनंद - ६ - माझ्याकडे सत्तापदे नका शिरू वाकडयात मला जर नडाल तर याद राखा! तुमची माझ्याशी गाठ -७ - मी जरी गेलो तरी येतील दोस्त माझ्याच साथिचे यातून मुक्ति नाही तुमची आम्ही "वैश्विक नेता " जातीचे -८-
********************************************************
फॅशन
अगं अगं बाई नको करू घाई जाहिरात तुझी आई माझे फॅशन बाई ||१|| तू ना एकाची ना बाप / लेकाची तू तर सर्वांची लड़की आहेस ||२|| फॅशन तुझे नाव नावातच ठाव तुला खुपच भाव आलेला आहे ||३|| तुझे नवनवे रूप पाहताच तरुण नाचायला लागतात , म्हाता-यांचे तर विचारायला नको तरुणांच्या पुढे स्वागताला धावतात ||4|| तुला माझी विनंती मान घेशील किती जोड़शील का सर्वांशी प्रेमळ नाते तू ||५||
|
----- माझ्या काही चारोळ्या ----
शब्द तुझे , शब्द माझे ,
वाचू आपण बेधुंद ,
बघ माझ्या मिठीत येउन
लागेल तुला माझाच छंद .....
----------------------------
तुझी आठवन आली
अन शब्द मुके झाले
रात्रीच्या चांदण्यातही
मन वेडेपिसे झाले
---------------------
रात्रि गोड चांदण्यात
मला तू दिसत होती
माझ्या पेक्षा वेगळी असुनही
माझीच वाटत होती
----------------------------
तू असे म्हणतेस
की तू प्रमाणिक जागतेय
माझे मान चोरूनही
आणखी काय मागतेय
----------------------------
मन आणि मेंदूत
आहे खुप मोठे अंतर
पण हे समजते खरे
वेळ गेल्या नंतर
-------------------------
दुराव्याचे शब्द सोडून तू आपुलकीने बोलावे आपण एकमेकांचे नसलो तरी तू प्रेमाने वागावे -------------------------
प्रेमासाठी झुरने,
ह्याला काय अर्थ आहे ?
एकटे जगण्यात ही,
काहीतरी स्वार्थ आहे !
------------------------------
भले हिटलर नसेल आज
पण आहेत त्याच्या खुणा,
जागोजागी , क्षणोंक्षणी
जाणवतात पुन्हा पुन्हा || १ ||
भयाने कोंडटलेले श्वास
अन् रक्ताळलेले भास्
विस्फारलेले डोळे
बघतात मुडदयांची रास || २||
गोळयांचे पाऊस
आणि बेधुंद आग
घोंगावताना मृत्युला ही
रक्ताचाच माग || ३||
सरणावर प्रेत
जळण्याचे विसरते
जवानीचे पोरीच्या
गिधाड लचके तोड़ते || ४||
पिसाळलेल्या लांडग्याला
लावतात मेंढ़यांची वाघर ,
राजाच जाळतोय
स्वत:चेच नगर || ५ ||
स्वस्तात मरणाचा
लिलाव चालूच असतो
फ़क्त नंबर कुणाचा
शोधत आम्ही बसतो || ६ ||
समरभूमीचे पाईक
आज झाले षंड
थिजलेल्या रक्ताने
होइल का बंड ? ||७||
वैदाचे पोर फिरतात
कुत्र्या शिवाय शिकारीला
दारोदार वैदीन मागते
कालच्या शिळया भाकरीला || ८ ||
********************************************************
भळभळत्या जखमेला
भळभळत्या जखमेला
दाबुन मी धरले आहे
तू फ़क्त एकदाच ये
थोडेच श्वास उरले आहे ||१||
विवशतेने जातानाही
मागे वळली होती
तुझ्याच नकळत तेव्हा तुझी
आसवे खळली होती ||२||
खात्री आहे मला
तू परत येशील
मी फ़क्त तुझीच आहे
म्हणत घट्ट मिठी मारशील ||३||
तुझ्या त्या मिठी साठी
आज मी जिवंत आहे
एकदाच मागे फिरून ये
श्वास थकले आहे ||४||
तू भेटलीच नाही तर
सरण माझे खचेल
वा-यावरती राख माझी
तुझ्या कुशीत बसेल ||५||
तू नाही आलीस तरी
मी राख होऊन येईल
मी फ़क्त तुझाच होतो
ह्याची खात्री देऊन जाईल ||६||
********************************************************
भास
तू खरी की फ़क्त तुझे भास
माझे मलाच कळत नाही
हे सत्य की फ़क्त आभास ,
तू मृगजळ की मायाजाल ?
मनाच्या खोल गाभा-यात
एक धूसर चित्र
खरेच तूच की फ़क्त तुझे भास ?
तुझ्याच आठवनिंची पंगत ,
आन् माझी एकाकी संगत,
धूसर तुझे भास ,
आन् माझे एकाकी श्वास ,
दुरून कुठुनतरी ,
येतोय तुझे आवाज़ ,
पण मला खरेच कळत नाही
हे सत्य की फ़क्त तुझे भास ?
********************************************************
सहज रस्त्याने
सहज रस्त्याने जाताना
नजर मारीली तिने
साथ दिली माझ्या मानाने
फार उन्मतपणे -१-
डोळे माझे तिथे स्थिरावले
नजर बाण मम भिरकावाले
मम बनाने लक्ष्य छेदिले
पुन्हा वलूनी तिने पाहिले -२-
तिने आडवा हात केला
रास्ता ओलांडून झाला
ती माझ्याकडे येत चालली
माझी पाउले तिथे स्थिरावली -३-
ती माझ्या जवळ आली
पाठमो-यास दादा म्हणाली
माझी पाउले चालू लागली
पुन्हा निराशेने -४-
********************************************************
मारताना
तुझी आठवण आली म्हणुन
पाणवले डोळे,
या जगात माझ्या सारखे
असतील किती खुळे ?
डोळ्यात माझ्या जमले
होते तारका पुंज ,
मीच माझ्या मनाशी
देत होतो झुंज ,
तुझी आठवण आली म्हणुन...
सुन्न पडले होते मन
पडले होते गात्र क्षीण
मीच माझे नाखुशीने
मारत होतो मन ,
आठवत होती तेव्हा मला
तुझी परवलीची खुण ,
तुझी आठवण आली म्हणुन...
आठवत होतो सहवासाचे क्षण
तुझा तो प्रश्न जपतोय मी
करशील का रे माझे रक्षण ?
पण! पण! मीच माझा ?
अन् तुझा केव्हाही नव्हतो
समाजाच्या बंधनात स्व:ताला
शोधत होतो , शोधत होतो स्व:ताला
आणि .....
तुझी आठवण आली म्हणुन...
मला जिंकन्याच्या प्रयत्नात
तुही हरली होती ,
मी मात्र हरवताना तुला
स्वताच हरलो होतो ,
तुही नाही, मीही नाही,
दुसरेच जिंकले होते ,
त्यांच्या मते त्यांनी
गुंफले होते रेशमी बंधाचे नाते.
समजले मला आज
तू लाचारीने जागतेय ,
स्वत:च केलेल्या चुकांचे
वाईट फळ भोगतेय,
पण पण मीही...
यापेक्षा काही वेगळा नाही ,
इथेच मी अनुभवतोय
मृत्युची खाई ,
मरता मरता जगताना
जिवंत प्रेत फिरतोय,
मनात फ़क्त तुझा आणि
फ़क्त तुझाच विचार करतोय ,
एकदाच संपविन म्हणतोय
हे नीरस आयुष्य ,
दररोज मारताना जगतोय
यात नाही आता स्वारस्य ,
पण ....
परत शेवटी तेच आडवे येतात
सैल झालेल्या बंधनात
परत परत बांधतात
शेवटी मी ही लाचार
सहन करतोय अत्याचार
नाही होते हे सहन
मारताना तोडायचेय मला
हे जीवनातील बंधन !!!
मारताना तोडायचेय मला
हे जीवनातील बंधन !!!
********************************************************
खंत
अंधाराची सुरवात अन् प्रकाशाचा अंत ,
आमवसेच्या अंधाराला , चंद्राचीच खंत ||१ ||
चंद्राचा प्रकाशाला , अंधाराचा आधार ,
सोबतीला असतो , चांदण्यांचा भार || २ ||
नदीकाठी रात्रीला , तारुण्याचा बहार ,
हिरव्या हिरव्या अंगावर , फुलांची चादर || ३ ||
प्राजक्ताचा घमघमाट , अन् रातरानी गोड,
मंद मंद मोग-याला , केवड्याची जोड़ || ४ ||
श्रुंगाराने बहरते , अन् अंघोळ तिला सुचते ,
पहाटभर ओल्याचिंम्ब, अंगाने नाचते || ५ ||
नाचताना तिला पाहून , चंद्र होई अनावर,
सूर्य येताना पाहून , तीही येते भानावर ||६ ||
शृंगार सोडून मागे , ती लाजुन दूर जाते ,
मनवताना चंद्राला , कधी कधी एकाकी रहते || ७ ||
********************************************************
तुझा कधीही नाही पण तुझ्यासाठी खपेल
मनातील आठवन मनातच थबकली काळजातील कळीने पापणी मुकेच हबकली || १|| तू गेली तेव्हाच डोळे आटले होते पुन्हा जुन्या आठवणीनी आसवे साठले होते || २|| आसवांची हिम्मत आता नाही जुनी डोळ्यांतील आसवांना कुंठित केले कुणी ? || ३|| का तू सहज इतकी झाली लाचार जगात कमी होते का ? वर तुझे अनाचार ! || ४|| तुझे बेधुंद विचार अन् थकलेले शरीर जर परत करत असेल तुझे पवित्र मन || ५|| फ़क्त एकदाच येउन मी परतले आहे माझ्या गोठलेल्या कानात येउन म्हण ! || ६|| तूला माझे नाही आता करता येणार पण तुला वा-यावर सोड़ने मला तरी नाही जमणार || ७|| मी तुला खात्री देतो मी तुला जपेल तुझा कधीही नाही पण तुझ्यासाठी खपेल || ८||
|