*******************************************************************************
मी कशी आहे ?
कधी मी वारयाची झुलूक असते तर कधी बेफाम वारा असते कधी मी पावसाची हलकी सर असते तर कधी समुद्रची लाट असते कधी मी डोलनारे कणिस असते तर कधी खम्बिर तरु असते कधी मी शांत नदी असते तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते मी तो सुर आहे जो मनाला दिलासा देतो, तर कधी हुरहुर लावतो बस आणि काय सांगू सगलच लिहिता येत नाही म्हनून म्हणते मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...... ******************************************************************************* | ******************************************************************************* असेच बसण्यात सजा आहे, हसण्यात खरी मजा आहे. रोज हसत-खेळत रहावे, मित्रांनी लिहिलेले विनोद रोज वाचावे. असेच बसण्यात सजा आहे, हसण्यात खरी मजा आहे. आपले विनोद दुसऱ्याला द्यावे, त्याचे विनोद आपण घ्यावे, असेच बसण्यात सजा आहे, हसण्यात खरी मजा आहे. *******************************************************************************
जोडीदार
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! एक मेकांना दिलेल्या दुःखांवर एक मेकांसोबत घालवलेल्या अनेक आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी.. आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! अनेक जुन्या आठवणींनी आणलेले एक मेकांच्या डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी..... आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! आयुष्यात पुढे येणारया अनेक दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी! आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात एक मेकांचा हात धरण्यासाठी, एक मेकाला सावरण्यासाठी....... |