आठवणींची जादुई झप्पी बेचैन करील तुझ्या मनाला
सुखद रेशीमगाठी गुंफत जातील प्रत्येक घडीला
क्षणोंक्षणीचा वाढत गेलेला तो दुरावा
जवळीक साधायचा प्रयन्त करील हर एक क्षणाला
चिंब ओल्या प्रेम सरींचा शिडकावा
तुझे मन हि तयार होईल त्यात भिजाया
अबोल अधरांच्या ह्या कळ्यांना
पुन्हा साथ दयावीशी वाटेल तुझ्या अधरांना
कळत नकळत जागवणारया हया आशेला
नव्याने अनुभऊ धुंद मिलनाच्या घडीला
तुझ्या माझ्या हया अनामिक नात्याला
सतत जोपासू मुक्यानेच ऋणानुबंधाला
बरसेल पुन्हा पाऊस तुझ्या मनीचा ...
प्रत्येक आठवण देईल सुगंध माझ्या प्रितीचा
*******************************************
जपलेले काही क्षण ...............
पुन्हा त्या क्षणांना,एक जादुई झप्पीची आस आहे.
गोड़ आठवणीनां ....................
पुन्हा निहारण्याची,एक नवीच बात आहे.
हळूवार तुझ्या मिठित................
ह्रदयाच्या स्पंदनांचा आभास हवा आहे.
रखरखित झालेल्या उष्ण मनाला,
तुझ्या शीतल स्पर्शाचा सहवास हवा आहे.
नयनांना माझ्या...................
तुझ्या चंचल नयनांची साथ हवी आहे.
वसंताच्या साक्षित सुकोमल अधरांवर,
तुझ्या अधरांची छाप हवी आहे.
जाणीवेच्या क्षितिजावर.................
दोन आत्म्यांच्या मिलनाचा भाग नवा आहे,
तुझ्या सोबतीचा प्रत्येक क्षण,
पुन्हा अनुभवण्याचा अट्टाहास नवा आहे
*******************************************
मनतृषणेच्या काठावरती
चहूकडे म़ज तूच दिसशी ||
श्यामल रंग तुझा श्रीहरी
रंगुनी जाते,तुझ्यात मी अशी ||
मीठी मीठी तुझी बाँसुरी
मुग्ध होतसे,सारे प्राणी ||
चंचल चक्षुत तुझ्या माधवा
सारी सृष्टि,विरुनी जाती ||
गोड स्मिति त्या तुझ्या केशवा
मधु चा स्वाद हि फिका भासती ||
मथुरेत सुदामा नैन पसारे
वाट पाहसी मधुसुदनाची ||
नील यमुना डोहावरती
तुझीच छबी आकार घेतसी ||
कालिया तो, जणु देसी निमंत्रण
फणा उभारुनी लिले खातिर ||
नीलमणीचा मयूर पंख हा
मुकुट मुकुंदा शोभुनी दिसती ||
कान्हा कान्हा राधा करीती
आज हि वृदांवनी, स्वर गुंज गुंजती ||
*******************************************
रोशनी का एक दिया
यूँ ही जलाता रहे|
जुडनेवाली हर आस
मुमकिन होती रहें|
ख़यालों के तसव्वुर में
एक नया जहाँ बने|
बढ़नेवाले हर कदम को
नई दिशा मिलती रहें |
कठिन समय को आसाँ करें
हिम्मत वो बढ़ती रहें|
आसमाँ को छूने का
जुनून सिने में पलता रहें|
एकता की ताकद
यूँ ही बुलंद होती रहें|
बूरी नजरवाले
हमेशा रूसवाँ होते रहें|
ख्वाहिशें ऐसे ही नहीं
मुकम्मल होती हैं |
हजारों कोशिशों कि
डोर बाँधनी होती हैं|
आओ कुछ ऐसा ....
करें महफूज अपने वतन को|
आतंक का नाम मिटायें
वतन में लाये अमन को |
*******************************************
विरह म्हणे विरह......
विरह म्हणे विरह,किती किती हा विरह?
नको रे लाऊ जीवा हा रोग
हा रोग बरा नाही
त्यात गुंतणे चांगले नाही.
वेड लावतो हा मनीला
पुरताच भरकटतो हा जीवनाला.
क्षणा क्षणाच्या वेळेला
करतो खुप तासां एवढा.
असतो ह्याचा वार slow poison सारखा
करतो हा असर कर्करोगा सारखा.
विरह म्हणे विरह,किती किती हा विरह?
सोड ह्याचा नाद, कसा हा हट्ट???
उगा कोणासाठी का जाळावा हा जिव ?
किंमत अपुली कधी होईल तिला हि स्पष्ट.
करेल तिचा हि कुणी अपेक्षा असा भंग
दे फुट्टास ची गोळी दाखव अपुला रंग.
*******************************************
मैत्री तुझी न माझी
कोण जाणे कशी वाढत गेली.
रोज़च इंद्रधनुषी रंगानी,
भावनांचे विश्व विस्तारत गेली...
खरचं,मैत्री किती सुंदर असते.
हे सहवासाने तुझ्या मला भासवत गेले.
अशीच ही मैत्री अतुट रहावी म्हणुन,
सतत तीचे धागे मी गुंफत राहिले...
रोज़च तुला पाहण्याचा मला छंद जडू लागला.
मैत्रीच्या ह्या अतुट नात्याला मन ही प्रश्न विचारू लागला.
रोज़च तुझ्या संवादात काही शोधण्याची खुरापात होती.
पण भावनांना माझ्या दडवण्याचा एक विफल प्रयन्त ही होता...
खुपदा असं वाटत राहिल,किती ही मनाची उंच भरारी,
निष्पाप मनाला ही आहे, आस आकाश मिलनाची,
निरनिराळ्या हया छटांना सांभाळायचे होते... जपायचे होते....
पण अनामिक भितीने मन ही व्याकुळ होत होते....
कोण जाणे कशी..... मैत्री मागे पडत गेली...
नविन नविन नात्यांमध्ये रूपांतरित होत गेली.
आकर्षण,आस,मोह, माया,विश्वास,
रंग नवे नवे दाखवत गेली....
*******************************************
पाऊस
धुंद पावसामध्ये पुन्हा तू असेच यावे,
ध्यानी मनी नसताना प्रेम सरीत चिंब भिजवावे...
बेधुंद तुझ्या नजरेत प्रित फुलूनी यावी,
थेट काळजात माझ्या खोलवर रुतावी...
खट्याळ समीरा गत खोडी तुझी असावी,
थरथरत्या अधरांना साथ तुझ्या अधरांची मिळावी...
गोऱ्यापान गालास माझ्या गुलाबी रंगात यावी,
शराबी तुझ्या नयनात मधुची धुंदी भासावी...
तव साथीची आस आता युगा युगांची होती,
जन्म जन्माची ओळख मला हि पटली होती...
*******************************************
बरस रे मेघा बरस ...
लाले लाल जाहली काया
घामाच्या ओघळती धारा
चिंब भिजू दे उष्ण गरीमा
बरस रे मेघा बरस ....
पुन्हा मातीचा गंध घेऊ दे
मोराचा नव छंद घेऊ दे
थोडीशी म़ज मौज करू दे
बरस रे मेघा बरस ...
पुन्हा होऊ दे मी नवतरुणी
नाचू दे म़ज मुग्ध होऊनी
हलकेच छेडिल समीर हटूनी
बरस रे मेघा बरस...
धुऊन निघू दे रंग नको ते
ऊन-पावसा लपाछपीत हे
पुन्हा लेऊ दे इंद्रधनुष ते
बरस रे मेघा बरस...
*******************************************
Life में चुका...
Life में चुका आपण खुपदा करतो.
चुकांपासून शिकायचे ?
कि चुका करतच जगायचे...
चुका करण्यात काय मजा असते ?
नाही ती तर एक गोड सजा असते .
पण ही गोड सजा आपण वरंवार भोगतो.
जाणते उमजते चुका सतत करतो.
तरी त्या चुका दुरुस्त करत नसतो.
चुका करत जगण्यातच सुख शोधत असतो.
पण सुख शोधण्याच्या नादात फक्त दु:ख जगत असतो .
चुकांवर मात करावी असे दिमाग सतत बजावतो .
पण हट्टी मनासमोर त्याचा नेहमी पराजयच ठरतो.
विजयाच्या खुशीत तो फुलतच जातो.
पण फुलताना सुगंध मात्र क्षणिकच राहतो.
Life में full time त्यातच दंग राहतो.
पण part time सुखाला मात्र दूर वेशीवर टांगतो .