आनंद राजगोळे

 

 

 

!! माझ्यासाठी वेळच नाहीसा झालाय !!

ह्या मुंबापुरीतच्या धगधग्या जीवनान
ह्या लोकलच्या सिग्नल प्रवासान,
तर ह्या बी.एस.टी.च्या ट्रापिक प्रवासान
माझा जीव कासाविस झालाय ...!!

हातातील चहा आजुन अर्धाच हाय
पण काय करू क्लासचा वेळ निघून चाललाय..!
वेळेवर तर बसचा पत्ताच न्हाय
त्यात मनात क्लास चुकल याची भीती हाय ....!!

सकाळच एक वर्तमानपत्र वाचायच हाय
काय करू क्लासला जायची घाईपण तेवढीच हाय ..!
ह्या लोकलचा तर सिग्नल लवकर सूटतच न्हाय
त्यात ऑफिसमधल्या बॉसची भीती मनात हाय ....!!

मित्र मैत्रिणी म्हणतात
आता आनंद मोठा झालाय ..!
नाही रे माझ्या सख्यानो
ह्या सगळ्यातन
मला माझ्यासाठीच वेळ नाहीसा झालाय ....!!
 
******************************************************************************

त्याच त्या मातीतिल जन्म माझा

त्या उंच कढ्या कपारीवर गाव माझ
मंदिरावरील शिखरासारख
त्याच त्या कढ्या कपारीवर पसरलेल्या

मातीतिल जन्म माझा !!१!!

त्या व्हरांड्यावरची
ती प्राथनेची जागा
त्या कट्यावरची
ती अभ्यासाची जागा
त्याच मातीतिल जन्म माझा !!२!!

तो घनदाट डोंगर
त्यात ओरडनारी कोकीळा
त्या आवाजात
हरवलेला जीव माझा
त्याच मातीतिल जन्म माझा !!३!!

त्या पडनार्या गोड सरीमध्ये
भिजनारा मी एकटा
त्यातच बासरीचा सुर
धरणारा सोबती माझा
त्याच मातीतिल जन्म माझा !!४!!

अशी ती पवित्र माती
तिन घेतल माझ्यासारख्या
वेड्या व अलड पोराला पदरात
तीच ती माती जिथे जन्मलो मी !!५!!
******************************************************************************

तु परत येशील का?

आशेवर आशा टेवून
वाट बगतोय मी तू परत येण्याची.
अस का वाट चुकण्याच कारण
मला सांगितल तू.
मी तर आजुन वाटच बगतोय
तु परत येण्याची ,
कुटल्या वळणावर चुकली आहेस तु परत तुला
माझा रस्ता सापडेल का?
तुझ्या जण्यान तर जगण्यातल
जगणच निघुन गेलय,
हे जगण आता फकत
तुझ्या आशेवरच जगतय.
तुझ्या परत येण्यान
माझ जीवन उजळणार आहे
ह्याला उजळयला येशिल ना ग.
अं सांग ना तु परत
येशील ना ग ...?
******************************************************************************

ह्या श्रावण मासात

येणार्या झुळूक वार्याबरोबर
फिरनार्या फुलपाखरा बरोबर
नव्याने पालवी फुटलेल्या गवताबरोबर
हरवून जावस वाटणारा हा श्रावण !! १ !!

हे सर हिरव रान
त्यावर आलेली पिकाना फूले
त्यांच्या सुटलेल्या त्या सुगंध वासात
फुलून जावस वाटणारा हा श्रावण !! २ !!

येणार्या पावसाच्या सरी संगती
नागपंचमीच्या पाळण्या संगती
त्याच्याच झोकेत आकाशात
भरारी घ्याविशी वाटणारा हा श्रावण !! ३ !!

फुललेल्या नव्या वनराई सोबत
त्यावर पडलेल्या दवा सोबत
सकाळी सुटलेल्या गुलाबी थंडी सोबत
मनसोक्त रमून जाणारा हा श्रावण !! ४ !!
******************************************************************************
 
 
 

ती काल माझ्या स्वप्नात आली ....

मला जणू ती परिच वाटली
आली नी खुदकन हसली
तिच्या हसन्यान पडलेली ती खळी
मला उमललेली कळीच वाटली
ती काल माझ्या स्वप्नात आली !! १ !!

मी तिला पहिल आणि मला एक प्रश्न पडला
मी तोच प्रश्न तिला विचारला
त्याच उत्तर मात्र तिने हसत दिले
ती काल माझ्या स्वप्नात आली !! २ !!

ती रात्र मात्र पुवेची होती
पडलेला प्रकाश मला तिच्या सौंदऱ्याचा वाटला
तो प्रकाश मात्र चंद्राचा होता
ती काल माझ्या स्वप्नात आली !!३ !!

येणाऱ्या झूळूक वार्याने मला जाग आली
सर्वत्र पसरलेली शांतता जागी झाली
ती मात्र हसत कुठेतरी निघून गेली
ती काल माझ्या स्वप्नात आली !! ४ !!
 
 ******************************************************************************
 
!! नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!

तुझ हसन आणि माझ फसन
कस एकाच वेळी घडल
हे माझ वेड मन
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!१!!

पुनवेच्या त्या मंद प्रकाशात
चेहरा तुझा दिसावा
त्यावर चंद्राचा प्रकाश पडावा
पडलेल्या खळीमधून तो उठून दिसावा
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!२!!

वाऱ्याचा एक झोका यावा
आलेल्या वाऱ्यान केस तुझे फुलावेत
त्यातील एक केस माझ्या चेहऱ्यावर यावा
आलेल्या केसान मन माझे जिंकाव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!३!!

पावसाची एक सर यावी
आलेल्या त्या पावसाच्या सरित
आम्ही दोघानी चिंब भिजाव
तश्याच त्या पावसात
मी तुला उचलून घ्याव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!४!!

तुझ्याच विचारत स्वप्नात हरवाव
त्यात तुझा चेहरा समोर यावा
तू त्यात गोड लाजाव
हे कस एकाच वेळी घडल
नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!५!!
******************************************************************************

ह्याच माझ्या आठवनी

माझ्या जीवनात तू फुल बनून आलीस
जस फुल कोमेजत तस तू कोमेजुण गेलीस
पण हे वेड माझ मन ते फुल आजून ताजच आहे
आस समजुन आजून श्वास घेत !! १ !!

तुला कदाचित समजल नसेल
एकाद्याला आर्ध्यावर सोडून द्यायच नसत
पण मी इकडे जगुन ........
मेल्यासारख जगतो आहे !! २ !!

तू कदाचित ते दिवस विसरली आसशील
पण मी त्याच दिवसतिल
एक एक क्षण आठवून
एक एक कविता लिहितो आहे !! ३ !!
******************************************************************************

मैत्री कशी करायची आसते ?

एकदा मैत्रीचा हात पुढे केला की
तो शेवट पर्यंत मागे घ्यायचा नसतो
एकदा शब्द दिला की
तो शेवट पर्यंत मागे घ्यायचा नसतो
मैत्री अशी करायची आसते............

चार दिवस मैत्री करायची आणि
नंतर विसरून जायच नसत
एकदा आपल्याबरोबर जीवापलीकडे
मैत्री करत आसेल तर त्याला दुःखवायच नसत
मैत्री अशी करायची आसते............
******************************************************************************

अस कस हे मन

समुद्रातून येणाऱ्या लाटेसारख
सकाळी पडणाऱ्या दवासारख
आळवावरील पाण्याच्या थेंबासारख
अस आसत हे मन !! १ !!

एकाला जीवापलिकडे जपणार
एकाला मनापासून मागणार
एकावर जीवापलिकडे इच्छा करणार
अस आसत हे मन !! २ !!

पडणाऱ्या सावळी सारख
चमकणाऱ्या चांदण्यासारख
येणाऱ्या झुळुक वाऱ्या सारख
अस आसत हे मन !! ३ !!

खरोखर मन हे किती हळव आसत
येतील ती स्वप्न रंगवणार
आणि त्या स्वप्नात बुडून जाणार हे वेड मन !! ४ !!

******************************************************************************

आठवण

हीच ती आठवण त्या दिवसाची
जिथे मी घेतली होती प्रेमाची शपथ
जिथे तू दिली होती जीवनात
शेवटपर्यंत सोबत रहायची वचने !! १ !!

हीच ती आठवण त्या दिवसाची
जिथे झालो आपण दोघही प्रेमी
जिथे घेतल्या आपण जीवनभर
एकत्र जागायच्या आनी !! २ !!

तू विसरली आसशील
पण तू माझा विचार केलिस का?
तोच तो ज्याला आपण दिलेली
वचने पूर्ण केलि नाही !!३ !!

त्याच आठवणी
मी एक एक करून कागदावर उतरवत आहे
तुझ्यासारखे कोणी चुकूनये म्हणून
त्यानाही हा सल्ला देत आहे !! ४ !!
******************************************************************************
 
 

!! जीवलग सखा तू माझा !!

माझा आणि तुझा वेशीच्या मैदानावर
रंगलेला विठ्ठि-दांडूचा डाव,
मी मैदानात उदास होऊन
पाहिलेली वाट , त्यात तुझ वेळान येण
त्यावर झालेल आपल भांडण
कीती छान रंगायचा ना रे आपला ह खेळ ....!!

तुझ आणि माझ ते दीवसभर खेळण
त्यामध्ये होणार आपल भांडण
माझ रुसण अन् तु काढलेली माझी समजुत
मग परत रंगलेला आपला डाव
कीती आगळ आणि वेगळ नात रे आपल्या मैत्रिच ....!!

माझा असा तुच आणि तुझा असा मीच होतो
जे मनातील न सांगता जाणून घेत होतो
न बोलता जायचो अन्
ते न ऐकताच समजुन जायच
हे आजुन कांही नव्हत रे तुझ आणि माझ जुळलेल एक मैत्रिच नात होत ....!!

आपला तो रंगलेला डाव मध्येच मोडायचा
बाबा पाठी लागले कि आपल आजी जवळ लपण,
बाबाचे पडलेले फटके त्यात माझ रडण
तुझ्या त्या पाणवलेल्या डोळ्याने माझी दुःख फुसण
कीती आठवणी रे ह्य आपल्या मैत्रिच्या ....!!

आता तर तु गेलास
तु गेल्यापासुन कधी आपला डाव रंगलाच नाही,
मी खुप रडलो रे पण
तुझासारख पाणवलेल्या डोळ्यानी माझी दुःख कुणी पुसलीच नाही,
तुझ्यासारख सगळ्याशी भांडलो रे पण
परत कुणी येवुन खांद्यावर हात टाकलाच नाही
तु गेलास रे पण खुप कांही मागे सोडुन गेलास रे....!!

आता तर त्या मैदानात आपला डाव कधी रंगतच नाही
प्रत्येक संध्याकाळ तुझ्या आठवणीची असते रे
मग मी रडतच बसतो रे
तु परत पाणवलेले डोळे घेवुन
माझे दुःख पुसायला येशिल या आशेने..!!

मी माझा एक बालमित्र आम्हि खुप खेळलो बागडलो, पण आमची ही मैत्रि अर्धीच राहिली .
तो आता या जगात नाही, पण त्याच्या आठवणी माझ्या मनात आजुनहि आहेत
 
******************************************************************************
 

!! मनू मैत्रीण !!

एक मुखी मैत्रीण माझी
नाव तीच "मनू",
तसा रागीट स्वभाव तीचा
पण माझ्याशी प्रेमळ वागण तीच....!!

माझ्या मुख प्राणीमित्रा मधली
आवढती मैत्रीण माझी,
तसा खट्याळ स्वभाव तीचा
तीच वागणही एक आगळ-वेगळच....!!

दुध तीच आवढत खाण
त्यात माझ चोरून वाढण,
आईची नजर चुकवीतो आम्ही
आईला चुकवून जेवण आमच....!!

ह्यातच जमली गट्टी आमची
दोन भिन्न मनाच्या, भिन्न प्राण्यांची,
चेंडुशी खेळ तीच आवडत खेळण
तसच झाडावर सरकन चढण तीच....!!

ही गट्टी आमची काही क्षणच टीकली
काळाने एक दीवस ह्या मैत्रीवर झडप घातली,
मनू गेली फिरया
आजुन ती परत आलीच नाही....!!

मी मात्र माझ्या मनाची
समजूत कढतोय,
मनू परत येण्याची
वाठच बगतोय...!!

तुझ्या आठवणीन तर
मी आसवे गाळतोय,
त्याच आसवातून तु परत
येण्याच एक नव स्वप्न बगतोय....!!

तुझ्यावर येवढा जीव
जडलाय ग माझा,
तुझ्याविना जीवन
संपतय ग माझ....!!

तुझा आवाज कानात
आजुन घुमतोय ,
दुधाच्या वेळेची
आठवण करून देतोय....!!

तु माघारी परत
येशील का ग,
मी अभ्यासाला बसल्यावर
तु गुरSSगुर गाण गाशील का ग....!!
******************************************************************************
 
 

 


मन हे एक फुलपाखरू

मन हे फुलपाखरासारख आसत
जस फुलपाखराच जीवन तसच
हे मन ही नाजुक आसत ............
फुलपाखराला हात लावला की
ते सापडत नाही मात्र ते आपल्या
हाताना रंगवून जात...
मन ही तसच ओळखायला गेल तर
ओळखत नाही
पण ते एकदा आकाशात भरारी
मारल्यासारख भरारी घेवून जात
आणि आठवणी मागे ठेवत .....
मग त्याच आठवणी
अश्या कागदावर उतराव्या लागतात
आणि त्याच आठवणीवर जगाव लागत
 
******************************************************************************
 

हे मन ……

अस का आसत हे मन
जे दिसणार्या गोष्टीच स्वप्न पाहणार
दिसनाऱ्या वास्तव्यात रंगून जाणार

समुर्दाच्या लाटेसारख सतत तळपत राहणार
नदीप्रमाण कोणत्या ना कोणत्या विचारत वाहत राहणार

पडनार्या सावळीसारख शीलता देणार
येणार्या वार्यासारख झूळूक वाहून जाणार

पडणार्या स्वप्नाला रंग देणार
त्यांच्यात गुंतून जाणार

आस हे मन क्षणातच वेड होणार
आणि क्षणात वेड बनवणार

 

******************************************************************************

स्वप्नात माझ्या मरण आल

स्वप्नात माझ्या मरण आल
सारा स्वर्गच मला दिसू लागला
मी तर न घाबरता
यम देवाला काही अटी घातल्या ..!!

माझ्या आई - बाबाना भेठायच आहे
ज्या मातेन मला घडवल
ज्या पित्याने मला आभा एवढा आधार दिला
अशिर्वाद घ्यायचा आहे !!.

माझ्या बहिण भावाला भेटायच आहे
ज्यांच्या बरोबर खेळलो बागडलो
त्यांनाच आता सोडुन जायच आहे ,
तुमच्यातील एक गडी
बाद झाला म्हणुन सांगायच आहे ..!!

माझ्या गुरुना भेटायचे आहे
ज्यानी मला शिकविले, संस्कार घडविले
त्या संस्काराची परत फ़ेड करयची आहे ..!!

माझ्या मित्र मैत्रिणीना भेटायच आहे
ज्यानी मला सख्या नात्यापैक्षा जपल
त्यानाच मी आता मुकणार आहे .!
त्यांच्या बरोबर राहुन केलेल्या
चुकिंची माफी मागायची आहे ...!!

मी ह्या जगातुन गेल्यावर मला माझ्या
जन्मदात्या मातीतच झोपायच आहे
ज्या मातीत जन्मलो शेवटही तिथेच करायचा आहे ..!!

माझे बोलने ऐकुण यमदेव थोडे विचारात पडले आणि
माझ जीवन मला परत देवुन गेले
******************************************************************************

कस हे भाऊ बहिणीच नात

अस हे भाऊ बहिणीच नात
शणात हसणार , शणात रडणार
शणात मारणार , शणात मार खाणार
शणात भांडणार , शणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! १ !!

ताई पाणी भरते , भाऊ तीला मदत करतो
तेच पाणी तो खेळन्यासाठी वापरू लागला की ताई त्याला ओरडते
पण ओरडन्यामागे तीचे भावावरिल प्रेम लपलेल आसत
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!२ !!

भाऊ मस्ती करतो , ताई त्याला फटका मारते
पण भाऊ लहान घरच्यांचा लाडका , तिला ओरडा पडतो
पण तोच आपल्या तीच सांत्वन करायला पुढे आसतो
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! ३ !!

बहिण सासरहून येते , भावाला खुप आनंद होतो
तो तिच्याशी परत आपल्या बालपनात हारून जातो
पण ती परत सासरला चालली की
तो घरातील एका कोपर्यात रडत बसतो
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !! ४ !!
 
******************************************************************************

माझ मन हरवल ह्या कवितेत

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणार
भरलेच डोळे कधी तर ओल आसवाना पुसणार !

कुणीतरी असावे
पैलतिरी साद घालणारे
शब्दाना कानात साठवून गोड प्रतिसाद देणारे !

कुणीतरी असावे
चादंन्याच्या बरोबर नेणार
अंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणार !

कुणीतरी असावे
फुलासारख फुलणार
फूलता फूलता सुगंध दरवळणार !

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणार
पालिकडील किनार्यावरून आपली वाट पहणार !

कवी कोण माहित नाही
 
******************************************************************************

माझ बालपण

माझ बालपन कास सांगू
तो कठा, ती खेळायची पडकी जागा,
ती लपाछपीची भींत, तो शिवाशिविचा खांब...
हीच ओळख त्या चिमुकल्या गावातल्या चिमुकल्या मुलाची
हेच माझ बालपण !!१!!

त्या पावसातिल भिजन ,त्यामधेच गोट्या खेळण,
आणि रात्री ताप आला की झोपेतच दिवसभरच सर्व बोलण बडबडन
हेच माझ बालपन !! २ !!

शाळेला जायची तयारी , त्यात अभ्यास अर्धा असलेला ती
तेवढीच भीती , खायला लागायचा गुरूजी कडून मार
पण कधी हरलो नाही अभ्यासात माग पार
हेच माझ बालपण !! ३ !!

खर अस कस असत हे बालपण
जणू एक जिवनातील आलड आणि करमनुकीच वय
देवा मला परत बालपण मिळेल का ?
नाही मित्रा ते एका वेळीच मिळत
असेच माझे विचार आणि असेच माझे बालपण !! ४ !!
******************************************************************************

असा कसा हा पावसाळा

हा थंड असा शीतल गारवा
ही पावसाची कोवळी सर
जणू काही घेवून येतात सगळे अभाळ अंगावर
असा हा पावसाळा !! १ !!

ही सर येताच आसे वाटे
जणू काही समुद्र धकलते अंगावर
किती मधुर क्षण हा हळवा
असा हा पावसाळा !! २ !!


त्या सोबत पडती त्या घारा
आसे वाठे सारे चांदने ओतती दारा
असा हा पावसाळा !! ३ !!

असाच हा पावसाळा लहानाच्या मोजमजेचा
पण मोठाच्या धग धगेचा
लहानाची मजा आणि मोटयाची होते सजा
असा हा पावसाळा !! ४ !!
******************************************************************************
 

आई

आई म्हणजे मायेच माहेर , ममतेच मंदिर
प्रेमान भरलेला जणू तो समुद्रच
आई बरोबर आसते तेव्हा
तिची कोठभर पण माया आपल्यला आभाळाएवढी वाटते

पाची पकवानाने बनवलेल्या जेवानापेक्षा
तिच्या हाताने बनवलेल्या झुणका भाकरीची चवच न्यारी
झुणका भाकरी कशी पण आसू देत पण
ती ज्या मायेच्या हाताने भरवते
त्या हाताची रंगतच प्यारी

पण तिला सोडून आता दुसरीकडे राहाव लागत
आणि दुसर्याच्या आईकडे बगून स्वप्नात हरवाव लागत
तिने चारलेल्या त्या हाताची आठवन झाली तर मात्र
डोळ्यातून अश्रुना आमत्रण द्याव लागत
******************************************************************************

मैत्री

मैत्री ही एक समूद्राला जोड़नाऱ्या दोन किनाऱ्यासारखी आसते
ती कधी ही तुटू शकत नाही .....

मैत्री ही एक गुंतलेल्या धाग्यासारखी आसते
तिला कितीही अलग करायला गेल तरी ती जास्तच गुंतत जाते पण तुटत नाही ....

मैत्री ही ताऱ्यासारखी आसते
तिला विसरली तरी ती आठवणीच्या रुपात भेटते ....

मैत्री ही निसर्गासारखी आसते
ती सगळ्याबरोबर सतत निर्मळ आणि स्वच्छ सुधंर आस नात टिकवायला शिकवते ....

मैत्री ही फुलासारखी आसते
ती सगळ्याना सुगंधी सुवासाप्रमाने मैत्री करायला शिकवते ......

******************************************************************************

मैत्री काय आसते

मैत्री ही समुद्रा किनारा आसते
ती कधीही एकमेकाची साथ सोडत नाही
आणि एकमेका पासून राहू शकत नाही !! १ !!

मैत्री ही फुलाच्या कळीसारखी आसते
ती स्व:त उमलत राहते
आणि इतरानाही आसच उमलत रहायला सांगते !! २ !!

मैत्री ही सूर्यासारखी आसते
ती स्व:त ही तेजस्वी आसते
आणि इतरानाही तेजेस्वी रहायला शिकवते !! ३ !!

मैत्री ही समईतल्या वातेसारखी आसते
ती स्व:त जळून इतराना प्रकाश देते
आणि इतरानाही तसाच प्रकाश द्यायला शिकवते !! ४ !!

मैत्री ही पाण्यासारखी आसते
ती स्व:त सारखे सर्वाना निर्मळ रहायला शिकवते !! ५ !!

******************************************************************************

लाडकी चिमुकली..

मी ग एक लाडकी चिमुकली
आई-बाबांची लाडकी पण..
दादाशी सतत भांडणार
तीच ग मी एक लाडकी चिमुकली....!!

आजी-आजोबाची ग
मी लाडकी नात ,
आजोबांची तर करते मी गाडी
आणी खेळते मी
तीच मी ग एक लाडकी चिमुकली ....!!

मामाची ग एक
लाडकी भाची मी,
त्याच्या पाठीवर बसुन
करते ग मी हत्तीची स्वारी
तीच ग मी एक लाडकी चिमुकली....!!

घरातल्या सगळ्याचिच
ग मी लाडकी,
पण माझ्या दादाची मी नावडती
त्याची आणी माझी रोज एकदा तरी होते गट्टी
तीच ग मी एक लाडकी चिमुकली....!!

सगळ्याकडे हट्ट धरणारी
सगळ्यचीच लाडकी,
चौकलेठसाठी सुध्दा रुसुन बसणारी
पण चौकलेठ मीळाल्यावर नखर्यावर नखरे करणारी
हाच ग माझा हट्टी स्वभाव आणी हिच ग मी सगळ्याची लडकी चिमुकली....!!

******************************************************************************

!! तू कसा !!

असाच एक अल्लड-खोडकळ
स्वभाव तुझा,
प्रेमाचा सागर तू मायेचा
स्वभाव तुझा....!!

तुझ्या बोलण्यान खूलत मन माझ
जशी कळी झाडावर खुलते,
तुझ्या न बोलण्यान होत मन उदास माझ
जस आळवावरील पाणी तिथेच तळपत....!!

तुझा मायेन पाठीवर फीरवलेला हात
आलेल्या समुद्रातील लाठेसारखा,
देतो मला जीवनात जगायची उमीद्द
सकाळच्या उगवणार्या सुर्य किरणासारखी....!!

तुझ्या बरोबर आसताना होतो
भास जीवनसथीचा मला,
जीवनात सुख दुःखात साथ
देणारा तुच एक सखा माझा....!!

नात आपल एक बंधनाच
बंधनाहून गुंतलेल्या मैत्रीच,
नात आपल स्नेंहाच
स्नेंहान गुरफटलेल्या धाग्याच....!!

मैत्री आपली जीवनातील
सुख दुःख आनंदान अनुभवणारी,
मैत्री आपली आयुष्यात
चांगल्या वाटेन जाणारी....!!
 
******************************************************************************

!! मैत्री तुझी माझी !!

मैत्री तुझी माझी
असावी फुलासारखी
शेवटपर्यंत सुगंध देणारी ,
तशीच ती फुलपाखरासारखी
मनसोक्त गंध लूटणारी ....!!

मैत्री तुझी माझी
असावी पाखरासारखी
सतत मुखी राहणारी,
मुखी राहूणही
खुप काही बोलणारी ....!!
मैत्री तुझी माझी
असावी धुक्यासारखी
क्षणापूरतीच गारवा देणारी ,
तशीच ती दवासारखी
अंगावर थंड पांगरूण जाणारी ....!!

मैत्री तुझी माझी
असावी सावलीसारखी
सतत विसावा देणारी ,
तशीच ती मनाला
शांत करून जाणारी ..!!

मैत्री तुझी माझी
अशीच असावी
सुखा दु:खात साथ देणारी
सुखात तुझी आसवे आसवीत
तर दु:खात माझे अश्रू आसवेत ....!!
******************************************************************************

येईल तो....

थोडयाच वेळात येईल तो
घेऊन वादळ वारा आन् खुप सार्या गारा,
करेल सार्या भुमीला तृप्त
देऊन गारवा आन् खुप सारा थंडावा....!!

होईल सारी भुमी भिजून चिंब
फुठेल तीला प्रेमाचा पाजर,
पेरीण मी तीच्यात बीज
उगेल ते घेऊनी अंकूर....!!

पांगरेल ही धरती हिरवा शालू
बनेल ह्या निसर्गाची राणी,
लाजेल ती नव्या नवरीसारखी
घेऊनी पावसाच्या सरी....!!

धरती पांगरलेल्या
ह्या हिरव्या शालू मधून,
वनराई फुलेल, फुललेली वनराई
वार्यासंगे थुई-थुई नाचेल....!!

गीळून पावसाला फुलेल ती
कोवळ्या फुलासारखी,
त्यावर फुलपाखरे मनसोक्त खेळतील
त्यांच खेळण नकळत ठीपेण मी ...!!
******************************************************************************