करुणा

 
वादळ .......

तो आलाच मुळी वादळ बनून,
आणि गेला आयुष्य बदलून !

वादळ म्हणजे उध्वस्त जीवन,
तो गेला ते सम्पन्न करून !

वादळ म्हणजे पड़झड़,
तो गेला मनाची उभारी देऊन !

वादळ म्हणजे विखुरणे,
तो गेला मला सावरून !

वादळ म्हणजे फक्त अश्रु,
तो गेला कायमचे हास्य देऊन !

वादळ मागे सोडते फक्त शुन्य,
त्याने शून्यापासून दिली सुरुवात करून !

वादळ म्हणजे फक्त पोकळी,
तो पोकळीत जग बनवायच गेला शिकवून !

माझ आणि फक्त माझच ते वादळ,
गेल आयुष्य बदलून !
 
गुलाबी कल्लोळ ...... !!

गंधाळलेला गुलाब,
माझ्या ओठांवर फुलाला,
मखमली स्पर्शाने त्या,
ओठांचा रंग गडद केला !

चंचल वाराही,
तुला फितूर झालेला,
मला पाहण्यासाठी,
खर तर तू आतुरलेला !

घननिले नभ तुझ्या,
साथीला धावले,
तुझ्या मिठीत मला,
खेचून आणले !

थेम्बाथेम्बाने त्या,
कशी जादू केलि,
तुझ्या माझ्या अंतरी,
सतार छेडूनी गेली !

पाहता तू असे चोरून,
जिव वेडाउन गेला,
तुझ्या मनातला कल्लोळ,
माझ्या डोळ्यात उमटला !!
आठवतोयस तू मला........ !!

आठवतोयस तू मला,
जेव्हा शोधते मी माझ्या काळजाला,
भूलविलेस ज्या क्षणी तू,
आठवताना त्या क्षणाला !!

आठवतोयस तू मला,
रात्री स्वप्ने पाहताना,
झोपेत स्मित करताना,
दचकून जागे होताना !!

आठवतोयस तू मला,
खिडकीतुन चन्द्र पाहताना,
एकांतात पावसाच्या सरी,
अंगावर झेलताना !!

आठवतोयस तू मला,
सुखाचा क्षण अनुभवताना,
मोकळ्या केसात माझ्या,
हात फिरवताना !!

आठवतोयस तू मला,
तुझ्या कविता वाचताना,
डोळ्यातून वाहणारे,
मोती वेचताना !!

आठवतोयस तू मला,
श्वास घेताना,
तू जवळ नसता,
तो अडवून बघताना !!
 
आजन्म .......

आजन्म तुझी साथ रहावी,
तू प्रियतम माझा आणि....
मी तुझीच प्रिया असावी !
तुझ्या प्रेमाच्या मंजुळ,
बासरीचे सुर मी व्हावे,
बासरीसम प्रिया मज तू,
अधराजवळी घ्यावे !
आता नसेल कहर,
इथे ग्रिष्माचा,
पहा साजणा आता,
आला ऋतू वसंत,
फुलन्याचा !
प्रवास पुढचा होइल सूखकर,
दोघे सोबत असताना,
तुझ्या पावलावर पाउल मी टाकताना !
पुनार्जन्माचे नाव साजणा,
कधीही न मी घ्यावे,
जन्मोजन्मीचे सुख तुला मी,
याच जन्मी द्यावे,
याच जन्मी द्यावे !!
 
 
साद मिलनाची ..... !!!

मिलनाची तुझी,
साद ऐकुनी,
मी ही सख्या,
आले मंत्रमुग्द्ध होउनी !!

तुझ्या बासरीच्या सुरांनी,
आसमंत निनादावा,
माझ्या सतारीच्या सुरांनी,
तू ही वेडा व्हावा !!

गंधाळलेल्या वाटेवरून,
तुझ्या सोबत चालावे,
मधुबनाचे सुख मी,
पुन्हा एकदा अनुभवावे !!

चोरट्या नजर भेटीचा,
खेळ मला भावला
लाज होउनी तो,
माझ्या डोळ्यात चमकला !!

तू पाहता रंग माझा,
खुलुनी गेला आणि,
तुझ्या ओठावरचा गुलाब,
माझ्या ओठांवर फुलला !!

तुझ्या माझ्या ओठांचा,
गोड़ संवाद झाला,
शुक्रताराही मग,
आपल्याकडे पाहुनी हसला !!!
 
कुणीतरी असाव .........

कुणीतरी असाव,
आपल वाटणार,
कुणीतरी असाव,
आठवण काढणार !

कुणीतरी असाव,
स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव,
आसव टीपणार !

कुणीतरी असाव,
गाली हसणार !
कुणीतरी असाव,
लाजवणार !

कुणीतरी असाव,
मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव,
चांदण्यांचा वर्षाव करणार !

खरच कुणीतरी असाव,
क्षितिजापार घेवून जाणार !!


 
स्पंदने ......... करुणाच्या चारोळ्याची
 
पारिजातकाचा सडा,
त्याच्या अंगणात पडायचा,
तो मात्र सतत,
कण्हेरीच्या मागे धावायचा !!
--------------------------
आजही आठवतात ती स्पंदने,
जी वाढली होती तुझ्या स्पर्शाने !
आणि थरथरली होती काया,
तुझ्या धुंद श्वासाने !!
--------------------------
मनात होते बरेच कही,
मनात सरे राहून गेले,
तुला द्यायचे सुख माझ्या,
ओन्जळीतून वाहून गेले !!
--------------------------
तुझा उतावीळपणा,
मला कासाविस करतो,
माझ्याही भावनांवरील,
मग माझा ताबा सुटतो !!
--------------------------
येत कुणीतरी नजरेसमोर,
आणि मी शहारते,
त्या शहरयातुनच मग,
मला माझी कविता भेटते !!
--------------------------
पहाटेच्या सौंदर्यावर माझ्या,
पवित्रतेचा साज,
छेडू नकोस प्रिया मला तू,
व्रतस्थ आहे मी आज !!
--------------------------
अबोल मनीची भाषा,
तुला समजेल का?
शब्दांच्या पलीकडले,
तुला उमगेल का?
--------------------------
यातना होतातच,
नात तुटताना,
यातनानाच आधार बनवायच,
आयुष्य जगताना !!
--------------------------
तुझ्याशिवाय आयुष्य मला,
मणामणाच ओझ वाटत,
मृत्यु कधी मिठीत घेइल,
अस मन आक्रंदत !!
--------------------------
दुराव्याची भीती,
सतत पाठलाग करते,
कुठेही लपले तरी,
ती मला शोधून काढते !!
--------------------------
पापण्यात स्वप्न लाटा,
उसळतात,
किनारयास भेटण्यास,
तळमळतात !!
--------------------------
 
 
 
 
मधुबन ..........


आभाळ होउन बरसला,
त्याने वर्षाव प्रेमाचा केला,
माझी न राहिले मी,
मधुबनात घेउन गेला!

अपूर्व सुख लाभले,
चांदण्यात घेउन गेला,
माझी न राहिले मी,
मधुबनात घेउन गेला!

स्पर्शात हरवले मी,
बेधुंद करुनी गेला,
माझी न राहिले मी,
मधुबनात घेउन गेला!

नजरेनेच आज तो,
स्पर्शुन देह गेला,
माझी न राहिले मी,
मधुबनात घेउन गेला!

फूल आज जाहले मी,
भ्रमर तो ही झाला,
माझी न राहिले मी,
मधुबनात घेउन गेला!

सहवास आज त्याचा,
मज उमलवून गेला,
माझी न राहिले मी,
मधुबनात घेउन गेला!
रातचांदण्या ओंजळीत....!!!

रातचांदण्या ओंजळीत माझ्या,
सडा त्यांचा घालू दे,
तेजोमयी प्रकाशात त्या,
प्रेम आपुले फुलू दे !

तुझ्या स्पर्शाने आज सख्या,
स्पंदने माझी वाढू दे,
तुझ्या धुंद श्वासाने,
माझी काया मोहरू दे !

थरथरती काया माझी,
मिठीत तुझ्या स्थिराऊ दे,
माझ्यावरील तुझे प्रेम,
आज मलाही समजू दे !

तुझ्या नजरेने मला,
रोमांचित होऊ दे,
मलाही तुला थोडा,
प्रतिसाद देऊ दे,
थोडा प्रतिसाद देऊ दे !!