कवी / कवयत्री

कविता वाचण्यासाठी कवी / कवयत्री च्या नावावर क्लिक करा
 
                  
 
 
ढीनच्याक ... एक व्यासपीठ! 
लाखो वाचक असलेले  मासिक वाचा  
 
http://dhinchak.darade.comTo learn  Dot Net Technology  please visit  on
 
www.dotnetlatest.com

                                ~  मनोमन ~

प्रत्येकाकड़े काहीतरी नैसर्गिक गुणवत्ता असते.
पण आमचे आकर्षण कवी आहे कारण वेद , पुराण , शास्र, इतकेच नव्हे तर जगातील सर्वात मोठे महाकाव्य  ज्याला म्हणतो ते महाभारत. संपूर्ण विश्वाचे लक्ष्य लागलेल्या ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेली - ज्ञानेश्वरी , तुकारामांची गाथा. हे लिहिणारे सर्व लोक महाकवि होते आणि आजही ते आपल्यात (काव्यरुपाने)  आहेत.
           वेद व्यास ते कवी भूषण , ज्ञानेश्वर माऊली ते कुसुमाग्रज इतकेच नाही तर शाहीर राम जोशी , पट्ठे बापूराव, अमर शेख , बाबासाहेब पुरंदरे  हे ही काव्याचे उपासक. जर इतिहास अमर करायचा असेल तर काव्य हा सर्वोत्तम मार्ग आहे.
कारण काव्यात गोडी असते, ताल, सुर, लय असतात जे मनावर खोलवर परिणाम करतात. काव्य मृदु असते, काव्यात सौंदर्य असते, माधुर्य असते, शौर्य असते. काव्यात कोणत्या भावना व्यक्त होतात यावर काव्य प्रकार ठरवतात.
             जे न देखे रवि ते देखे कवी - या उक्तीप्रमाणे  कवी आपल्या प्रतिभेने ह्या विश्वाच्या पलिकडे जावून विचार करू शकतो आणि नवनिर्माणाची आस जगवतो.
                ह्या समाजावर, संस्कृतिवर आणि संस्करावर कवींचा खुप प्रभाव असतो आपण कवींचे ह्या समाजावर खुप उपकार आहे आणि त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून मी माझा हा छोटासा प्रयत्न्य जगातील सर्व कवींना अर्पण करतो .
               मी सर्व प्रकारच्या कवींना विनंती करतो की आपण एकत्र येउन सर्वांचे मनोरंजन आणि ज्ञान मिळेल तसेच सर्व प्रकारच्या काव्याचा विकास होईल असे काव्य निर्माण करावे 
 - बाजी  दराडे
 संपर्क :- बाजी दराडे
baji@darade.com
 

Showing 0 items
New Column
Sort 
 
Showing 0 items